। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
पेणमधील एका अल्पवयीन मुलीसोबत प्रेमाचा बनाव रचून गेल्या दीड वर्षाच्या कालावधीत तिच्यावर शारिरिक अत्याचार केल्याची घटना सोमवारी (दि.22) उघडकीस आली. याप्रकरणी पेण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपीस मंगळवारी रात्री आठ वाजता अटक करण्यात आली आहे.
अल्पवयीन मुलीच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत आरोपी (रा.बहीरमकोटक ता.पेण) याने तिच्यावर प्रेम करतो असे सांगून बनाव केला. तसेच मातीराम तलावाशेजारील झुडपात इच्छेविरोधात तिच्यावर शारिरिक अत्याचार केला. परिणामी, पिडित अल्पवयीन मुलगी गर्भवती झाली.
याप्रकरणी पेण पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली आहे. पुढील तपास मपोसई घाडगे करीत आहेत.