अल्पवयीन मुलीवर बलात्कार

गोवे-कोलाड | वार्ताहर |
रोहा तालुक्यातील मढाली आदिवासीवाडी, ऐनवहाळ तेथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला असून, या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. पीडित अल्पवयीन मुलगी आपल्या घराच्या अंगणात बाहेर एकटीच खेळत असताना, आरोपी राहणार मढाली आदिवासीवाडी, पो. ऐनवहाळ, तालुका रोहा, वय 22 याने तिला त्याच्या राहत्या घरात नेऊन बलात्कार केला. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असून, संताप व्यक्त करण्यात येत आहे. कोलाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शुभाष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पाली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तृप्ती बोराडे, पोलीस ए.एल. घायवट हे पुढील तपास करत आहेत. आरोपीविरोधात कोलाड ठाण्यामध्ये पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version