हवाई दल अधिकार्‍याचा सहकार्‍यावर बलात्कार

कोईम्बतूर | वृत्तसंस्था |
महिला सहकार्‍यावर बलात्कार केल्याच्या आरोपावरुन हवाई दलाच्या एका अधिकार्‍याला अटक करण्यात आली आहे. कोईम्बतूर एअरफोर्स कॉलेजमध्ये ऑगस्ट महिन्यात देशभरातून एकूण 30 हवाई दल अधिकारी कोईम्बतूर एअरफोर्स कॉलेजमध्ये ट्रेनिंगसाठी आले होते. पीडित 29 वर्षीय महिला अधिकाऱी बास्केटबॉल खेळताना जखमी झाली होती. तिचा पाय जखमी झाला होता. यामुळे झोपण्यापूर्वी तिने पेनकिलर घेतलं होतं.त्यावेळी आपल्यावर बलात्कार झाल्याचा आरोप या महिलेने केला आहे. आपण वरिष्ठ अधिकार्‍यांकडे तक्रार केली, मात्र कोणतीही कारवाई झाली नाही असा महिला अधिकार्‍याचा आरोप आहे. यानंतर तिने कोईम्बतूर शहराच्या पोलीस आयुक्तांकडे आणि गांधीपूरम महिला पोलिसांकडे तक्रार केली. तपासाअंती लेफ्टनंट असणार्‍या आरोपी अधिकार्‍याला अटक करण्यात आली.

Exit mobile version