अंजुमन महाविद्यालयाला मानांकन

। कोर्लई । वार्ताहर ।

मुरुडमधील अंजुमन इस्लाम ही एक जुनी शैक्षणिक संस्था आहे. या संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना दर्जेदार पदवी शिक्षण देण्याचे कार्य सन 2009 पासुन अंजुमन इस्लाम जंजिरा डिग्री कॉलेज ऑफ सायन्स मार्फत करण्यात येत आहे. यु.जी.सी संचलित नॅशनल असेसमेंट अँन्ड अँक्रिडिएशन काऊंसिल (नॅक) द्वारे महाविद्यालयाचा शैक्षणिक दर्जा तसेच विद्यार्थ्यांना देण्यात येणार्‍या सोयी सुविधा याची तपासणी करण्यात येते. यानंतर महाविद्यालयाला उचित मानांकन देण्यात येते. या महाविद्यालयास प्रथम 2019 साली बी मानांकन प्राप्त झाले होते. यानंतर नॅकद्वारे पाच वर्षांनी पुनः पडताळणी 3 व 4 सप्टेंबर रोजी संपन्न झाली. यासाठी नॅक पिअर टीम मध्ये डॉ. के.एम. अबूबकर चेअरमन, डॉ. बुधीन गोगई समन्वयक, व डॉ. तरंजीत सूद सदस्य म्हणून लाभले होते.

Exit mobile version