रवींद्र मांडे यांची बिनविरोध निवड

| रसायनी | प्रतिनिधी |

भात गिरण सहकारी प्रक्रिया संस्था लिमिटेड दहिवली या संस्थेच्या अध्यक्षपदाची निवडणूक नुकतीच पार पडली. सहकारी अधिकारी (श्रेणी 2) सुनील दागंट यांची अध्याशी अधिकारी म्हणून त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत रवींद्र मांडे यांची संस्थेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारताना रवींद्र मांडे यांनी उपस्थितांना संबोधित करत सांगितले की, संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी आणि संस्थेच्या फायद्यासाठी जे-जे निर्णय घ्यावे लागतील, ते सर्व सहकाऱ्यांच्या विश्वासात घेऊन व संमतीने घेतले जातील. संस्थेचे कामकाज अधिक सक्षम व पारदर्शक करण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करू, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुधाकर घारे तसेच माजी आमदार सुरेश लाड यांचे विशेष आभार मानले. यासह उपस्थित सर्व सहकारी, संचालक मंडळ व संस्थेच्या कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त करत त्यांनी अधिकृतपणे अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. यावेळी शरद लाड, परशुराम घारे, अनिल रोकडे, बाळू थोरवे, नामदेव मोडक, गोविंद जाधव, महादेव लोंगले, भगवान चव्हाण, नंदकुमार मोरे, प्रविण देशमुख, वंदना देशमुख, छाया वेखंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version