माथेरानमध्ये विक्रमी कर वसुली

| माथेरान । वार्ताहर ।

माथेरानमध्ये दरवेळी प्रवासी कराचा ठेका दिला जात होता. आजवरच्या काळात अनेक ठेकेदारांनी नगरपरिषदेच्या या ठेक्याची पूर्ण रक्कम अदा केलेली नसल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान नगरपरिषदेला सोसावे लागले होते. परंतु एक वर्षांपूर्वी सुरेखा भणगे यांनी मुख्याधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर नगरपरिषदेचे आर्थिक स्तोत्र असणार्‍या प्रवासी कर संकलनावर लक्ष केंद्रित करून मुख्य प्रवेशद्वार असणार्‍या दस्तुरी नाक्यावरील प्रवासी करातील वसुलीच्या बाबतीत जी काही गळती लागली होती ती थांबविण्यासाठी पुढाकार घेतला.

ज्या ठेकेदारांना प्रवासी कराचा ठेका कोरोना काळात 70/30 टक्के प्रमाणे देण्यात आला होता. तो ठेका काढून घेत सर्व प्रवासी कराची वसुली नगरपरिषदेच्या कामगारांमार्फत सुरू केल्यामुळे नगरपरिषदेच्या उत्पन्नात भर पडली आहे. दिवाळीच्या हंगामात केवळ सात दिवसात दि.24 ते 30 ऑक्टोबर या सात दिवसांत एकूण 40350 आबालवृद्ध प्रवासी दाखल झाले. यामधुन नगरपरिषदेला 20,53,000 इतके विक्रमी उत्पन्न प्राप्त झाले आहे.

एप्रिल 2022 पासून नगरपरिषद मार्फत सुरु आहे. प्रवासी करातील उत्पनात वाढ व्हावी व आर्थिक व्यवहारात पारदर्शकता राहावी यासाठी सप्टेंबर 2022 पासून डिजिटल तिकीट प्रणाली न.प. द्वारे सुरु केली असून त्याद्वारे अधिक अचूक, आणि त्वरित तिकीट काढता येते, तसेच तिकिटावर अद्ययावत पावती क्रमांक, दिनांक, वेळ, आणि न.प. ची सर्व माहिती बारकोड द्वारे देण्यात आली असल्यामुळे नागरिकांना एक क्लीक वर कार्यालयीन इत्यंभूत माहिती भेटत असल्याने पर्यटक, नागरिक समाधानी आहेत. सर्व माहिती सॉफ्टवेअर प्रणालीशी जोडलेली असल्यामुळे, भविष्यातील प्रत्येक महिन्यातील पर्यटकांची संख्या, लक्षात घेऊन पुढील नियोजन पालिका प्रशासनाला करणे सोयीचे होईल. आणि अधिक चांगल्या सेवा पर्यटकांना देणं सोपं होणार आहे.

Exit mobile version