| रसायनी | प्रतिनिधी |
रिस येथील विजय कांबळे हे सन 2011 साली आरोग्य खात्यातून कंपाउंडर या पदावरुन निवृत्त झाले. त्यांचे स्टेट बँक ऑफ इंडीयाच्या मोहोपाडा शाखेमध्ये खाते असून, त्यात त्यांची सेवींग होती. दरम्यान, त्यांना अनोळखी व्यक्तीचा फोन आला व सांगितले की, तुमच्या जुन्या बँक खात्यावर करोडो रुपये जमा आहेत. त्यामुळे तुम्हाला अटक करण्यात येईल. त्यानंतर व्हीडीओ कॉल करून पोलीस गणवेशातील व्यक्तीने जे-जे सांगितले ते-ते विजय कांबळे करत गेले. त्यानंतर पोलीस गणवेशात असलेल्या व्यक्तीने त्याच्या खात्यवर पैसे पाठवायला सांगितले, आणि कांबळे यांनी ते पाठविले देखील. त्यानंतर कांबळे यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी बँकेशी संपर्क साधला. त्यानंतर त्यांनी रसायनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. रसायनीचे पोलीस निरीक्षक अभिजीत भुजबळ व पोलीस हवालदार संतोष म्हात्रे यांच्या प्रयत्नाने संबंधित रक्कम होल्ड करण्यात आली. त्यानंतर कोर्टाकडून रिफंडची प्रक्रिया केल्यावर संपूर्ण रक्कम त्यांना परत मिळाली.
फसवणूक केलेल्या वृद्धाची रक्कम परत
