| मुंबई | प्रतिनिधी |
राज्यातील कापूस खरेदीची मुदत वाढवण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत होती. या अनुषंगाने पणन विभागाने कापूस खरेदी मुदत वाढवण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला होता. या मागणीचा सकारात्मक विचार करून केंद्र सरकारने राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देत कापूस खरेदीसाठीची मुदत 15 मार्च 2026 पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे केली. यासोबतच राज्य शासनामार्फत हरभरा खरेदी प्रक्रीया राबवली जाणार आहे. 1 मार्च 2026 पासून शेतकरी नोंदणी आणि 5875 रुपये प्रती क्विंटल या हमीभावाने हरभर खरेदी सुरू करण्यात येत आहे, अशी माहितीही पणन जयकुमार रावल यांनी विधानसभेत दिली.
कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606