| मुंबई | प्रतिनिधी |
दुर्गराज रायगडावर शिवभक्त आणि पर्यटकांच्या सोयीसाठी महाराष्ट्र शासनाने अत्याधुनिक शासकीय रोपवे उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पाला पुरातत्त्व विभागाची मान्यता मिळाली असून, लवकरच कामाला सुरुवात होणार आहे. सध्या खासगी रोपवेसाठी प्रतिव्यक्ती सुमारे 325 ते 350 रुपये तिकीट आकारले जाते. नवीन शासकीय रोपवे सुरू झाल्यानंतर हा दर 50 ते 100 रुपयांपर्यंत मर्यादित ठेवण्याचे नियोजन आहे. तसेच गडावरील संवर्धनासाठी लागणाऱ्या साहित्याच्या वाहतुकीचाही खर्च मोठ्या प्रमाणात कमी होणार असल्याने शासनाच्या कोट्यवधी रुपयांची बचत होणार आहे.
शिवभक्तांना दिलासा
