हनुमान जन्मोत्सवानिमित्त धार्मिक कार्यक्रम

oplus_2

| खांब | प्रतिनिधी |

रोहा तालुक्यातील कृषीनिष्ठ बाहे गावामध्ये सालाबादप्रमाणे याही वर्षी दि.1 आणि 2 एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सव सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. रायगड भूषण डॉ.मारूती महाराज कोलाटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त बुधवारी (दि.1) सायंकाळी हरिपाठ, त्यानंतर किर्तन आणि महाप्रसाद देण्यात आला. रात्री 11 वाजता भव्य काठी मिरवणूक सोहळा पार पडला. तर गुरुवारी (दि.2) सकाळी 7 वाजता श्री हनुमान जन्म सोहळा व अभिषेक, सकाळी 10 वा श्री सत्यनारायणाचु महापूजा, दुपारी 1 वाजता पालखी सोहळा व रात्रौ महाप्रसाद आदी धार्मिक तथा अध्यात्मिक कार्यक्रम पार पडले. यावेळी आपल्या हरि किर्तनरूपी सेवेप्रसंगी सुप्रसिद्ध किर्तनकार व समाजप्रबोधनकार डॉ.हरिदास महाराज पालवे शास्त्री यांनी हिंदू हा धर्म नाही, तर ती एक जीवन प्रणाली आहे. भारतासारखे राष्ट्र संपुर्ण जगामध्ये नाही. तर मातृभाषा हे आपल्या वैभवाचा ठेवा असून तो ठेवा आपण जतन करून ठेवला पाहिजे, अशाप्रकारचे प्रबोधनात्मक विचार व्यक्त केले. या संपुर्ण सोहळ्याचा यशस्वीतेसाठी ग्रामस्थ व महिला मंडळ (बाहे) तसेच तरूण मंडळ (बाहे) अधिक मोलाचे सहकार्य केले.

Exit mobile version