जयंत माईणकर
केरळच्या अयप्पा स्वामी मंदिरात परंपरेनुसार 10 ते 50 वयोगटातल्या महिलांना मंदिरात प्रवेशबंदी आहे. मात्र सुप्रीम कोर्टाने सर्वच महिलांना मंदिर प्रवेश देणारा निकाल सुनावल्यानंतर हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर अमित शाह यांनी नाराजी व्यक्त करत आस्थेच्या विषयात न्यायालयाने ढवळाढवळ करू नये असे म्हणत आपली बुरसटलेली जुनाट विचारसरणीची झलक दाखवली. तर ’बहु’ स्मृती इराणी यांनी देवळात जाऊन कोणालाही अपवित्र करण्याचा अधिकार नाही असं म्हणत आपली जुनाट विचारसरणी दाखवून दिली.
लोकशाहीमध्ये लोकसंख्या महत्त्वाची ठरते. 80 टक्के हिंदू 15 टक्के मुस्लिम लोकसंख्येमुळे खतरेमें असतात हे पटणारे नाही. मग हे तमाम सनातनी, उच्चजातीवर्गीय रेशीमकिडे हिंदूंना सतत 15 टक्यांची भीती का दाखवीत असतात?
त्यांचे हे डावपेच 15 टक्क्यांना नियंत्रित करण्यासाठी आहेत की 66% मागास हिंदूंना? (25 टक्के अनु. जाती, जमातींनी 41 टक्के ओबीसी) यांना फोडूनतोडून, कायम विभाजित ठेवून गुलाम राखण्यासाठी आहेत? हिंदू संघटन हे दाखवायचे उद्दिष्ट असून प्रत्यक्षात सर्व मागास वर्गियांना कायम आपल्या वर्चस्वाखाली, जातीपातीच्या मानसिकतेत बंदीस्त (विघटित) करून ठेवणे हे खरे राष्ट्रीय काम हे मनुपुत्र करीत असतात. कशाला हवे वर्चस्व? राहू की सगळे भावंडं म्हणून.
संख्येने कमी असूनही मनुवादी बुद्धीच्या जोरावर, 66% हिंदू बहुसंख्यकांना दुय्यम नागरिक बनवण्याची ही रेशिमकिड्यांची वर्चस्ववादी मानसिकता ओळखायला हवी. बहुजनांची शिकूनसवरूनही स्वतंत्रपणे विचार करण्याची क्षमता का विकसित होत नाही? बौद्धिक, धार्मिक गुलामीची नशा स्वातंत्र्याच्या 75 मध्ये तरी उतरेल अशी आशा करूया का? – प्रा. हरी नरके
फेसबुकवरुन साभार
महंमद पैगंबरांचा विवाह आणि इस्लाम धर्मातल्या काही मान्यतांबाबत टाइम्स नाऊ या वृत्तवाहिनीवर ज्ञानवापी मशिदीच्या मुद्द्यांवरून बोलताना भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी अत्यंत आक्रमकपणे पैगंबरांविषयी काही उद्गार काढले होते. त्यांच्या विधानांची री भाजपचे दिल्लीतले नवीन जिंदाल यांनी ओढली आणि हा वाद वाढला.भाजपने नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांना पक्षातून निलंबित करत त्यांचं प्राथमिक सदस्यत्व रद्द केलंय. पण हे दोघे तर केवळ संघ विचारसरणीचे शिपाई (षेेीं ीेश्रवळशीी) म्हटले पाहिजेत.
या वादग्रस्त वक्तव्यानंतर मोदी सरकारवर जगभरातून टीका सुरू झाली आणि भारतातही त्याचे पडसाद उमटले. कतार, कुवेत, इराण या देशांसह इस्लामिक कोऑपरेशन या आंतरराष्ट्रीय संघटनेनं यावर जोरदार आक्षेप घेतलाय. या देशांनी त्यांच्या देशातील भारतीय राजदूतांना बोलावून घेतलं आणि आपला निषेध व्यक्त केलाय. तसंच, हे मत भारत सरकारचं अधिकृत मत नसून देशातल्या असामाजिक तत्त्वांचं हे मत आहे. याचा भारत सरकार पुरस्कार करत नाही, हे स्पष्टीकरण भारत सरकारला द्यावं लागलं. भाजपचा मुस्लिम द्वेष सर्वश्रुत आहे. राम मंदिर आंदोलनापासून दिलेली हिंदूची मते मिळविण्यासाठी असा मुस्लिम द्वेेष भाजपला ठेवण क्रमप्राप्तच आहे.
पण त्याचबरोबर नुपूर शर्माला फाशी द्या अशी मागणी एम आय एम चे खासदार इम्तियाज जलील यांनी केली ती सुद्धा तितकीच चूक आहे. नुपुरला नेपाळमधून जसा पाठिंबा मिळाला तसाच नेदरलँड्सचे खासदार गिर्ट विलडर्स यांनीही नुपुरला पाठिंबा दिला.
पण हाच भाजप किंवा संघ परिवार हिंदू देव देवतावर जर कुणी टीका टीपणी केली तर किंवा एम एफ हुसेन यांनी देव देवतांची नग्न पेंटिंग्ज काढल्यानंतर त्याच्याविरुद्ध वादळ उठवून त्याचा निवडणुकीत फायदा घेण्यास मागेपुढे पाहत नाही. सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिरास हिरवा कंदील दाखवल्यानंतर आता गोहत्या, बुरखा, ज्ञानव्यापी मशीद यासारख्या भावनिक विषयाद्वारे आपला मुस्लिमद्वेष तेवत ठेवून त्याचा फायदा 2024 च्या लोकसभा निवडणूकीत होईल याची तजवीज करून ठेवली.
राम मंदिर आंदोलनापासून देशातील जातीय वातावरण अतिशय गढूळ होऊ लागलं झालं आणि संघ प्रणित भाजप बहुमताने 2014 साली सत्तेवर आल्यानंतर ते वातावरण पूर्ण खराब झालं. याआधी सहा वर्षे अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते. अर्थात बहुमतपासून 90 ने दुर असणार्या भाजपने आपला खरा चेहरा लपवून ठेवला होता. जर वाजपेयींना सुद्धा बहुमत मिळालं असतं तर त्यांची चाल सुद्धा मोदींप्रमाणेच राहिली असती. मुळात जे गेल्या आठ वर्षात भारतात हिंदुत्वाच्या नावाने सरकारी संरक्षणात घडत आहे तो संघाचा किंवा भाजपचा खरा चेहरा आहे. या चेहर्यात नेहरू – गांधी परिवाराची अत्यंत खालच्या दर्जावर जाऊन निंदा करण्यापासून देशातील प्रत्येक मुस्लिम नाव असलेल्या शहराच नामांतर करणं, बुरखा, गोहत्या यासारखे विषय काढून लोकांच्या भावना भडकवणं हेच काम सुरू आहे. जगातल्या प्रत्येक धर्माच्या इतिहासात डोकावून पाहिलं तर आजच्या विज्ञानयुगात बुद्धीला पटू न शकणार्या अनेक घटनांची रेलचेल आहे. अगदी संख्येने छोट्यातल्या छोटा असलेल्या धर्मापासून मोठ्यातल्या मोठ्या धर्मापर्यंत ही परिस्थिती सारखीच आहे. आणि प्रत्येक धर्मातील धर्ममार्तंड धर्मात उल्लेखिलेल्या कुठल्याही घटनेबद्दल चर्चा करण्यास तयार नसतात. पण अशा प्रत्येक धर्मातील पौराणिक घटनेबद्दल चर्चा व्हावी या मताचा मी आहे. आणि हे करत असताना कोणत्याही धर्माचा अवमान होऊ नये याचीही काळजी घेतली पाहिजे. पण सर्वच धर्मांचे लोक यासाठी तयार होण्याची शक्यता कमी आहे.
उपलब्ध आकडेवारीनुसार जगात सुमारे 238 कोटी ख्रिश्चन, 191 कोटी मुस्लिम, 116 कोटी हिंदू, 57 कोटी बुद्ध असे चार प्रमुख धर्म आहेत. त्याचबरोबर 119 कोटी कुठल्याही धर्माला न मानणारे लोक आहेत. अर्थात हिंदू धर्म संख्येच्या दृष्टीने जगातील तिसर्या क्रमांकाचा धर्म आहे. 14 व्या शतकापासून ख्रिश्चन धर्मात बायबलमध्ये लिहिलेल्या अनेक मान्यतांच्या विरोधात आवाज उठवला गेला. खुद्द पोपच्या अनिर्बंध अधिकारालासुद्धा खिळ घालण्यात आली. त्यातूनच प्रॉटेस्टंट पंथाचा जन्म झाला. पृथ्वी स्थिर असून, सूर्य आणि इतर ग्रह तिच्याभोवती फिरतात या ख्रिश्चन धर्मामधील मान्यतेला कोपर्निकस, गॅलिलिओ या शास्त्रज्ञांच्या शोधामुळे धक्का बसला.अर्थात या धार्मिक मुद्द्यांवर युरोपात मोठ्या प्रमाणात संघर्ष आणि रक्तपात झाला. तरीही शेवटी विज्ञानाची सरशी झाली आणि ख्रिश्चन समाज प्रगती करू शकला. अर्थात हे होऊ शकल याच कारण शैक्षणिक, आणि वैज्ञानिक दृष्ट्या समाज प्रगल्भ झाला होता. ऊर तळपलळ लेवश (दा वींची कोड) यासारख्या या शतकात तयार झालेल्या साहित्यकृतीवर आणि चित्रपटावर वाद झाले, काही ठिकाणी बंदीही आली.
केरळच्या अयप्पा स्वामी मंदिरात परंपरेनुसार 10 ते 50 वयोगटातल्या महिलांना मंदिरात प्रवेशबंदी आहे. मात्र सुप्रीम कोर्टाने सर्वच महिलांना मंदिर प्रवेश देणारा निकाल सुनावल्यानंतर हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर अमित शाह यांनी नाराजी व्यक्त करत आस्थेच्या विषयात न्यायालयाने ढवळाढवळ करू नये असे म्हणत आपली बुरसटलेली जुनाट विचारसरणीची झलक दाखवली. तर ‘बहु’ स्मृती इराणी यांनी देवळात जाऊन कोणालाही अपवित्र करण्याचा अधिकार नाही असं म्हणत आपली जुनाट विचारसरणी दाखवून दिली. म्हणजेच आज 21 व्या शतकातसुध्दा अशी विचारसरणी असणार्या व्यक्ती हिंदू धर्मातही आहे. जी कट्टरता बर्याच प्रमाणात शिक्षित असलेल्या हिंदू समाजात आढळते त्याहून जास्त कट्टरता शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या असलेल्या मुस्लिम समाजात आढळते. आपल्या देशापुरते बोलायचे झाल्यास हिंदूंनी धार्मिक कट्टरता सोडण हे योग्य आहे. पण धार्मिक कट्टरता सोडली तर भाजपमध्ये काहीच राहणार नाही. किंवा ही धार्मिक कट्टरता आहे म्हणूनच संघ परिवार आणि भाजप आहे. पण आपली कट्टरता झाकण्याकरता इतर धर्माच्या त्यातही मुख्यत्वे मुस्लिम धर्माच्या चुका दाखवतात. पण युरोपातील अनेक ख्रिश्चन देशांनी कट्टरता सोडली. इतर धर्म कट्टरतेच्या जोखडातून बाहेर आले की नाही हे न पाहता त्यांनी कट्टरता सोडली. नेहरूंच्या नेतृत्वाखालील भारताने कट्टरतेचा कधीही अनुभव घेतला नव्हता. पण सध्या मात्र दुर्दैवाने देशात त्या कट्टरतेचच राज्य आहे. आणि आपली कट्टरता झाकण्यासाठी इतर धर्मियांच्या बद्दल टीपणी करत आहेत, जे अयोग्य आहे. तूर्तास इतकेच!