| नवी मुंबई | वार्ताहर |
री-युनियन इयत्ता दहावीच्या डीव्हीएस बॅच 2005 आणि ज्ञान विकास संस्था यांच्या सहकार्याने शाळेच्या माझी विद्यार्थ्यांचाचा गेट टुगेदरचा कार्यक्रम कोपरखैरणे येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी ज्ञान विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲड. पी.सी. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाला ज्ञान विकास शाळेचे माजी अध्यक्ष गजानन पाटील, माध्यमिक वि. मुख्याध्यापक सुदाम कापडणीस, प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक जगन्नाथ दळवी यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
18 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर सर्व मित्र-मैत्रिणी एकत्र आले होते. यावेळी सर्वजण शाळेच्या जुन्या आठवणींमध्ये रमून गेले होते. कार्यक्रमाची सुरुवात शाळेची घंटा वाजवून करण्यात आली. त्यानंतर प्रार्थना आणि राष्ट्रगीत घेण्यात आले. सन्मामनीय अतिथी आणि शिक्षकवर्ग यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून पुढील कार्यक्रम सुरु केला. आलेल्या मान्यवरांचा पुष्पगुच्छ, नारळ, सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच रि-युनियन ग्रुपतर्फे शाळेला सदिच्छा भेट म्हणून पुस्तकरुपी भंडार देण्यात आले, सर्व मान्यवरांच्या हस्ते त्याचे अनावरण करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन रि-युनियन ग्रुपच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पूजा गवळी, सुषमा बोराटे, वैभव जगे, राहुल यादव, सतीश इरशेट्टी, मनोज भालेराव, कल्पेश पाटील, अजित म्हात्रे यांनी मेहनत घेतली.