। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
कोरोनाची घटती रुग्णसंख्या लक्षात घेऊन केंद्रीय निवडणूक आयोगाने आज कोरोनाचे निवडणूक कार्यक्रमांसंबंधी निर्बंध काही प्रमाणात शिथील करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानुसार यापुढे रॅली आणि जाहीर सभांमध्ये अधिक सवलती देण्यात आल्या आहेत. आता 50 टक्के क्षमतेचे निर्बंध रद्द करीत पूर्ण क्षमतेने सार्वजनिक सभा घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. म्हणजेच आता मैदानात पूर्ण क्षमतेने रॅली आणि जाहीर सभा घेता येणार आहेत. याशिवाय रोड शो करण्यासही परवानगी मिळाली आहे.
निवडणूक प्रचारावरील निर्बंध हटविले
