शांतिवन येथे प्रयोगशाळेचे नुतनीकरण

। नवीन पनवेल । वार्ताहर ।
इनरव्हील क्लब ऑफ बॉम्बे नॉर्थ आयलंड यांच्यामार्फत कुष्ठरोग निवारण समिती, शांतीवन संचालित अण्णासाहेब सहस्रबुद्धे अनुदानित माध्यमिक आश्रम शाळा शांतिवन पनवेल येथे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी प्रयोगशाळेचे नुतनीकरण करण्यात आले. त्यावेळी अपर्णा घनसानी ,पुष्पा सूर्यमूर्ती , फाल्गुनी मेहता, इनरव्हील क्लब ऑफ बाँम्बे नॉर्थ आयलंडच्या सर्व सदस्य, कुष्ठरोग निवारण समिती शांतीवन संस्था अध्यक्षा रक्षाताई मेहता, कार्यवाह विनायक शिंदे, संजय गुळूमकर, प्रतिक्षा जाधव, आश्रम शाळेचे माध्यमिक मुख्याध्यापक, प्राथमिक मुख्याध्यापक तसेच शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
अण्णासाहेब सहस्रबुद्धे अनुदानित माध्यमिक आश्रमशाळेत 500 विद्यार्थी शिक्षण घेत असून या आदिवासी विद्यार्थ्यांना शहरातील विद्यार्थ्यांप्रमाणे सर्व सुखसुविधा व उत्तम शिक्षण मिळावे म्हणून संस्था अध्यक्षा रक्षाताई मेहता, फाल्गुनी मेहता, संस्था पदाधिकारी सतत प्रयत्न करत असतात. मुख्याध्यापिका वैशाली पाटील यांनी पाहुण्यांचे आभार मानले.

Exit mobile version