| पनवेल | प्रतिनिधी |
इनरव्हील क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रिअल टाऊनच्यावतीने दि. 4 एप्रिल रोजी वनवासी कल्याण आश्रम आदिवासी मुलांसाठीचे वसतिगृह चिंचवली, ता. पनवेल येथे सौरऊर्जा तंत्रज्ञान प्रकल्प बसवण्यात आला असून, त्याचे उद्घाटन डिस्ट्रीकट इएसओ डॉ. शोभना पालेकर यांच्या हस्ते झाले. इनरव्हील क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रिअल टाऊनच्यावतीने 2 केव्हीचा ऑन ग्रीड इन्व्हर्टर देण्यात आला आहे.
या कार्यक्रमात क्लबच्या अध्यक्षा कल्पना नागावकर यांनी प्रकल्पाची माहिती सांगितली. डॉ. शोभना पालेकर यांनी मुलांना वीज बचत कशी करावी याचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास क्लबच्या माजी अध्यक्षा शुभांगी वालेकर, डॉ. साधना गांधी, डॉ. जयश्री पाटील, प्रतिभा लादे व ज्योती गुंदेचा हजर होत्या. तसेच वनवासी कल्याण आश्रमचे अधिकारी सतीश गुणेवश्री, संदीप शिंदे हजर होते. सौरऊर्जा तंत्रज्ञान प्रकल्प बसवण्याचे काम हरित सोलार एनर्जीचे राजू श्रीखंडे यांनी केले.