। अलिबाग । वार्ताहर ।
रायगड भुषण प्रख्यात कीर्तनकार पुरुषोत्तम पाटील महाराज उर्फ (बापू) यांचे शनिवारी (दि. 04) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ (डोलवी) या गावी सायंकाळी 6 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. बापूंच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण रायगडमधील वारकरी सांप्रदायावर शोककळा पसरली आहे. त्यांचा रायगड जिल्ह्यात वारकरी सांप्रदाय वाढविण्यासाठी अतिशय मोलाचा वाटा होता.
प्रख्यात कीर्तनकार पुरुषोत्तम पाटील महाराज अनंतात विलीन
