आंबेवाडीच्या लेखपालपदी रेणुका कळमकर यांची निवड

। गोवे-कोलाड । वार्ताहर ।
रोहा तालुक्यातील आंबेवाडी प्रभागांमध्ये चंद्रशेखर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेवाडी प्रभागात रणरागिनी महिला प्रभाग संघ आंबेवाडी स्थापन करण्यात आला. यामध्ये पुगाव येथील रेणुका कळमकर यांची लेखापालपदी निवड करण्यात आली. तर हर्षा अम्रुस्कर अध्यक्ष, सुजाता पडवळ सचिव, सुरेखा कापरे कोषाध्यक्षयांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी पंचायत समिती सदस्य सिद्धी राजीवले, सुरेश महाबळे, प्रितम पाटील, नेहा म्हसकर, जयेश घावटे तसेच तालुका अभियान व्यवस्थपन कक्ष रोहा सर्व कर्मचारी व प्रभागातील सर्व ग्रामसंघ अध्यक्ष, सचिव, लिपिका, उपस्थित होत्या.

Exit mobile version