मुरुडमध्ये जेष्ठ नागरिकांचा सन्मान

| मुरूड | वार्ताहर |

बाळासाहेब ठाकरे चषक 2023 च्या निमित्ताने मुरुड शहर ठाकरे शिवसेना शाखेच्या वतीने मुरुड मधील 140 जेष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी केदार दिघे, सुरेंद्र म्हात्रे, प्रशांत मिसाळ, दीपश्री पोटफोडे, राजेश्री मिसाळ, सुधीर ढाणे, हर्षल घरत, अमिर ठाकूर, नौशाद दळवी, चंद्रकांत मोहिते, अनिल ठाकूर, नरेश कुबल, रूपेश रोटकर, बाळकृष्ण गोंजी, प्रमोद भायदे, कुणाल सतविडकर, मुग्धा जोशी, शहर महिला संघटीका सुहासिनी सुभेदार, अनुजा दांडेकर, प्रशांत कासेकर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शहरप्रमुख आदेश दांडेकर यांच्या नेतृत्वाखाली सर्वं शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात मेहनत घेतली होती. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते यावेळी प्रथम क्रमांक विजेता संघ एलिजंट मुरूड संघाला रोख रक्कम 31,111 व चषक देऊन सन्मानित करण्यात आले. द्वितीय क्रमांक विजेता संघ आर्यन गृप मुरूड ला 21,111 रोख रक्कम व चषक देऊन सन्मानित करण्यात आले, तृतीय व चतुर्थ क्रमांक विजेते संघ खोपोली सेवन व सतेश्‍वरी मुरूड संघाला 5,555 रोख रक्कम व चषक देऊन सन्मानित करण्यात आले.

Exit mobile version