| श्रीवर्धन | वार्ताहर |
महाराष्ट्रात सत्ता बदलानंतर आमच्यावर टीका करणार्यांबद्दल आत्ता कोणतेही भाष्य न करता वेळ येईल तेव्हा नक्की उत्तर देऊ, असे उद्गार खा. सुनील तटकरे यांनी श्रीवर्धन तालुक्यात बोलताना काढले. बोर्लीपंचतन विभागातील आडगाव, वडवली, वेळास, खुजारे आदी गावांतील विविध विकासकामांच्या नुकत्याच झालेल्या भूमीपूजन, उद्घाटन आदी कार्यक्रमांच्या वेळी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, श्रीवर्धन हे पर्यटनाचे दृष्टीने महत्त्वाचे ठिकाण असल्याने या भागांत प्रदूषणकारी कारखान्यांनी हानी होईल असा कोणताही प्रकल्प येणार नाही याची काळजी घेऊ, तसेच या भागातून सागरी महामार्ग जाणार असल्याने या भागात आर्थिक सुबत्ता येईल, स्वयंरोजगारामध्ये वाढ होईल. या कार्यक्रमाप्रसंगी महंमदभाई मेमन, सुकुमार तोंडलेकर, मंदार तोडणकर, सुचिन कीर, सिद्धेश कोसबे, सुजित पाटील, शरद खेडेकर व परिसरातील अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टीका करणार्यांना योग्य वेळी उत्तर देऊ; खा. तटकरे
