मधुमेह तपासणीला प्रतिसाद

| सुकेळी | वार्ताहर |

सुकेळी येथिल बी. सी. जिंदल चॅरिटेबल ट्रस्ट रुग्णालयाच्या सौजन्याने रुग्णालयात सोमवारी (दि.29) घेण्यात आलेल्या मधुमेह तपासणी शिबिरात नागोठणे विभागातील तसेच कंपनीमधिल कर्मचार्‍यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या तपासणीचा 106 नागरीकांनी लाभ घेतला. जिंदल रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. गोपाल परमार यांच्या मार्गदर्शनाखाली नागरीकांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण तपासून ज्यांना साखरेचा काही त्रास असणार्‍या नागरीकांना मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिरामध्ये ऐनघर ग्रामपंचायत हद्दीतील गावे, तसेच जिंदल व विभोर कंपनीतील कर्मचार्‍यानी शिबिराचा लाभ घेतला.

Exit mobile version