। सुकेळी । वार्ताहर ।
सुकेळी येथील बी.सी. जिंदल चॅरिटेबल रुग्णालयाच्या सहकार्याने लायन्स क्लब कोलाड-रोहा तसेच, लायन्स हेल्थ फाऊंडेशन अलिबाग यांच्यावतीने बुधवारी (दि.26) जिंदल रुग्णालयात मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये जिंदल कंपनीतील कर्मचारी, तसेच ऐनघर, खांब, नागोठणे परीसरातील एकुण 63 नागरीकांची डोळ्यांची तपासणी करुन मोफत औषधे देण्यात आली. तसेच, ज्यांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेची गरज आहे त्यांच्यावर चोंढी येथील लायन्स हेल्थ फाऊंडेशन येथे मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. या शिबिरामध्ये 5 ते 6 नागरीकांना मोतीबिंदू झाल्याचे निदर्शनास आले आहे. या शिबिरासाठी चोंढी येथील नेत्रतज्ज्ञ डॉ. प्रतिक कणसे, डॉ. नितेश म्हात्रे, डॉ. रुणाली मल्हार, तसेच लायन्स क्लब कोलाडचे अध्यक्ष डॉ. मंगेश सानप, डॉ. विनोद गांधी, रविंद्र लोखंडे, राजेंदर कप्पु, विठ्ठल साबळे, नंदकुमार कलमकर, रविंद्र लोखंडे, चंद्रकांत लोखंडे यांचे विशेष सहकार्य लाभले.