| महाड | वार्ताहर |
छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावर जाणाऱ्या वयोवृद्ध व शाळकरी मुलांसाठी सोयीस्कर असणाऱ्या हिरकणी वाडी येथील रायगड रोपवे हा तांत्रिक देखभाल व दुरुस्तीसाठी 3 मार्च ते 7 मार्च पर्यंत बंद राहणार असल्याने पर्यटकांची व शिवभक्तांची गैरसोय होऊ नये. यासाठी रायगड रोपवे चे साईट इन्चार्ज राजेंद्र खातू यांनी काढलेला प्रसिद्ध पत्रकात स्पष्ट केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगड पाहण्यासाठी देश विदेशातून तसेच राज्याच्या कानाकोपऱ्यातून व शाळा महाविद्यालयातून हजारो पर्यटक किल्ले रायगड वर येत असतात रायगडावर पायऱ्यांद्वारे जाणे अनेकांना शक्य होत नसल्याने हिरकणी वाडी येथे असणाऱ्या रायगड रोपवे ने अनेक जण किल्ला पाहण्यासाठी जात असतात. रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या हिरकणी वाडी येथे रायगड रोपवे कार्यरत आहे. या रोपवेच्या माध्यमातून शासकीय अधिकाऱ्यांसहित राज्याचे व केंद्राचे मंत्री व लाखो शिवभक्त किल्ल्यावर ये जा करीत असतात रायगड रोपवे प्रकल्प सन1996 स*** व्ही .एम .जोग( कै. विष्णू महेश्वर जोग) यांनी स्थापन केला. ते या प्रकल्पाचे जनक आहेत त्यांच्यामुळेच आज वृद्ध व अपंग तसेच शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना रायगड किल्ल्यावर जाणे सोईस्कर झाले आहे. रायगड रोपवे 3 मार्च ते 7 मार्च या कालावधीत तांत्रिक देखभाल दुरुस्तीसाठी बंद राहणार असल्याने पर्यटकांची व शिवभक्तांची गैरसोय होऊ नये. यासाठी रायगड रोपे ची साईट इन्चार्ज राजेंद्र खातू यांनी पर्यटकांना व शिवभक्तांना आगाऊ सूचना या पत्रकाच्या माध्यमातून दिल्या आहेत.