। नेरळ । प्रतिनिधी ।
भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे 24 ते 28 फेब्रुवारी हा आठवडा अर्थिक साक्षरता दिन म्हणून साजरा केला जातो. म्हणून हा आठवडा, वित्तीय समझदारी, समृद्ध नारी या थीमवर साजरा करण्यात आला. यामध्ये कर्जत येथील मानीवाईज अर्थिक साक्षरता केंद्राद्वारे बँक ऑफ इंडियाच्या सहकार्याने गुरूवारी (दि.27) वाकस येथे स्वाधार मेळा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात उपस्थित लोकांना अर्थिक साक्षरतेचे प्रशिक्षण देऊन, जसे फसवणूक आणि त्याची तक्रार निवारण प्रणाली, डिजीटल बँकिंग, सिबिल स्कोअर तसेच, सरकारी योजना ज्यामध्ये प्रधानमंत्री जीवन ज्योत विमा, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, अटल पेन्शन योजना, सुकन्या समृद्धी योजना या विषयी माहिती देण्यात आली. या सुविधांचा स्वाधार मेळावा लावून सहभागींच्या कुटुंबांना सुविधाचे फॉर्म भरून देण्यात आले. यावेळी स्वाधार फिनएक्सेस टीममधून सी.एफ.एल. इन्चार्ज स्मिता दारोळे व प्रशिक्षक भावना जाधव उपस्थित होते.