। अलिबाग । प्रतिनिधी ।
रायगड जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढी अलिबागच्या चेअरमनपदासाठी सहकारी पतसंस्थेचे जिल्हा उपनिबंधक प्र.का. जगताप यांच्या अध्यक्षतेखाली व सहाय्यक निबंधक श्रीकांत पाटील यांच्या उपस्थित निवडणूक कार्यक्रम पार पडला. यावेळी सर्व संचालक उपस्थित होते. त्यामध्ये संस्थेचे पॅनल प्रमुख राजेश सुर्वे यांची चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली. सुर्वे यांची निवड झाल्याबद्दल त्यांच्यावर विविध माध्यमांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. यावेळी शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हात्रे, शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष उदय गायकवाड, जिल्हा कार्यवाह विजय पवार, संस्थेचे संचालक नरेंद्र गुरव, उमेश महाडेश्वर, जितेंद्र बोडके, भगवान घरत, रवींद्र पालकर, सुशील वाघमारे, निलेश साळवी, देवानंद गोगर, रेश्मा धुमाळ, राजेंद्र पाटील, प्रतिभा पाटील, प्रमोद भोपी, राजेंद्र फुलावरे, प्रफुल्ल पवार, बालाजी गुबनरे आदी उपस्थित होते.