खोपोलीत जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धाना प्रतिसाद

। खोपोली । वार्ताहर ।
कुस्तीमहर्षी भाऊसाहेब कुंभार कुस्ती न्यास आणि खालापूर तालुका कुस्तीगीर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि रायगड जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्या मान्यतेने कुस्तीमहर्षी भाऊसाहेब कुंभार यांच्या जयंतीचे औचित्य साधून भव्य जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन येथील लायन्स क्लबच्या भव्य हॉल मध्ये करण्यात आले होते. त्या स्पर्धेत अनेक मल्लांनी चटकदार कुस्त्या करीत कुस्तीप्रेमींची वाहव्वा मिळविली.

स्पर्धेचे उदघाटन अर्जुन पुरस्कार विजेते आंतराष्ट्रीय खेळाडू तथा प्रशिक्षक काकासाहेब पवार यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान खालापूर तालुका कुस्तीगीर अध्यक्ष डॉ.सुनील पाटील यांनी भूषविले.यावेळी अंकित साखरे, किशोर पानसरे, संजय शिर्के, प्रमोद महाडिक, खोपोली पोलीस निरीक्षक शिरीष पवार, खालापूर पोलिस निरीक्षक अनिल विभूते, अमोल जाधव, संदीप वांजळे, छत्रपती पुरस्कार विजेते मारुती आडकर, सुभाष घासे,दत्तात्रय पालांडे,गुरुनाथ साठेलकर, जितेंद्र सकपाळ, सचिन मोरे, तानाजी चव्हाण, दिलीप देशमुख, भरत शिंदे, दिलीप कचरे, दिनेश मरागजे, संदीप पाटील ,विजय चव्हाण अनिल सावंत, जयेश पाटील उपस्थित होते.


स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाण
14 वर्ष मुली (30किलो) प्रथम – कु.आस्था मरागजे,द्वितीय कु.रुतुजा मरागजे,35किलो वजनी गट -प्रथम-हांसिका कुंभार,द्वितीय-निर्जरा पाटील,40किलो वजनी गट-प्रथम -क्षितीजा मरागजे,द्वितीय-जान्हवी सकपाळ,45किलो वजनी गट -प्रथम -कु राजनंदिनी दुंदले,द्वितीय- प्रणिती शिंदे,50किलो वजनी गट -प्रथम -कु. सानिका सत्रे,द्वितीय श्रावणी जाधव

14 वर्ष मुले -25 किलो वजनी गट -प्रथम कु- प्रथमेश म्हात्रे,द्वितीय कु.श्रेयस शिंदे,30 किलो वजनी गट -कु.वेद मरागजे, कु.भूमीत म्हात्रे, 35 किलो वजनी गट-प्रथम कु.आदर्श नाळे, द्वितीय कु.सिद्धार्थ भोपी, 40 किलो वजनी गट -प्रथम -कु. शिवम म्हात्रे,द्वितीय- ओम म्हात्रे, 45 किलो वजनी गट-प्रथम -कु-वेदांत पाटील,द्वितीय -कु.सुशांत सरक

17 वर्ष मुली 40 किलो वजनी गट -प्रथम-कु.सई शिर्के,45 किलो वजनी गट -कु.आरती शिंदे,द्वितीय कु.प्रियांका मेश्राम, 50 किलो वजनी गट-कु.फरा कर्वेकर,55 किलो वजनी गट-वैष्णवी कुंभार,60 किलो वजनी गट -प्रथम वैष्णवी गंगावणे,द्वितीय श्‍वेता शर्मा,17 वर्ष मुले 45 किलो वजनी गट-कु.भूषण पवार,द्वितीय -प्रतीक घाटावकर,50 किलो वजनी गट-प्रथम.नयन पाटील,द्वितीय आयुष पाटील,55 किलो वजनी गट -अवधूत खोत,दिशांत सोनार,60 किलो वजनी गट-कु. यश मढवी, 65 किलो वजनी गट -गणेश खाडे वरीष्ठ गट महिला 53 किलो वजनी गट.प्रथम -पायल मरागजे,द्वितीय -सानिका झांजे,57 किलो -देवयानी बडगुजर,60 किलो सेजल पाटील,65 किलो प्रथम अमेघा घरत,द्वितीय भाविका खरमाळे,70 किलो – सानिका राऊत वरीष्ठ गट पुरुष -50 किलो -प्रथम -.विशाल भगत, द्वितीय विवेक धुळे,55 किलो -.चिराग गायकवाड,वरून पाटील,60 किलो -राज पाटील,विजय धुळे,65 किलो -रोहिदास पाटील,पंकज जोशी,70 किलो किरण ढवळे,रोहित काळे,75 किलो -दिवेश पालांडे रोशन धुळे, 76 किलो वरील ओमकार निंबळे करण बामगुडे यांनी स्पर्धेत यश संपादन केले आहे. प्रास्तविक संस्थेचे अध्यक्ष राजाराम कुंभार यांनी तर सूत्रसंचालन रायगड भूषण जगदिश मरागजे सर यांनी केले

Exit mobile version