| नागोठणे । वार्ताहर ।
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तसेच सुनील तटकरे युवा प्रतिष्ठानच्या वतीने तसेच राष्ट्रवादीचे नागोठण्यातील ज्येष्ठ नेते भाई टके यांच्या मार्गदर्शनाखाली गणपती आणि गौरी पर्यावरण पुरक आरास स्पर्धेचे आयोजन नागोठण्यात करण्यात आले होते.
या स्पर्धेमध्ये तब्बल 45 स्पर्धकांनी सहभाग दर्शवला असून त्या सर्व विजेत्यांना सोमवार (दि. 5) सप्टेंबर रोजी पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यावेळी विलास चौलकर, राष्ट्रवादीचे नागोठणे शहर बाळा टके, राजेश पिंपळे, मनोज टके, प्रथमेश काळे, धृव सोष्टे, अक्षय नागोठणेकर, केतन भोय, उमेर सांगडे, दिनेश घाग, अभिषेक वाळंज, रिचा राजेंद्र धात्रक, स्नेहल सिध्देश काळे, सोनी प्रथमेश काळे, अचर्ना राजेश पिंपळे आदींसह कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
गणपती आरास स्पर्धेत विशाल पिंपळे याने प्रथम, अजिंक्य कोते व शेखर जोगत यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. हर्ष नागोठणेकर व चिराग सावंत यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक मिळविले. तर गौरी आरास स्पर्धेत सोनाली ईप्ते, डॉ. नरेश सोष्टे व प्रवीण पवार यांनी पहिले तीन क्रमांक मिळविले. सुवर्णा सकपाळ यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक मिळविले.