सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेच्या सभेला प्रतिसाद


| कोर्लई | वार्ताहर |

रायगड जिल्हा सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेच्या मुरुड शाखेची वार्षिक सभा व मेळावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष धुरंधर मढवी यांच्या अध्यक्षतेखाली माळी समाजाच्या सभागृहात घेण्यात आला. जिल्हा अध्यक्ष धुरंधर मढवी, प्र.गो.पाटील, दि.ना.गीरकर, जाधव, वावेकर या मान्यवरांच्या हस्ते प्रथम दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सेवानिवृत्त संघटनेचे अध्यक्ष सेवानिवृत्त तहसीलदार नयन कर्णिक, उपाध्यक्ष केशव साने, सचिव मनोहर दिघे, कार्यकरणी सदस्य रमेश कवळे, रविंद्र जंजिरकर, बाळकृष्ण कासार, सुभाष पाटील, सुगंधा दळवी, वैशाली कासार, आशालता बाक्कर, उषा खोत यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.

मनोहर दिघे यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचन करून नवीन कार्यकारणी निवड करण्यात आली. यात शकील कडू , श्री. गद्रे, अनघा चौलकर, रमेश कवळे, नयन कर्णिक, रवी जंजिरकर, बाळकृष्ण कासार, केशव साने, नैनिता कर्णिक, उषा खोत, सुधीर पाटील, मंगेश मोहिते यांची निवड करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व कार्यकारणी सदस्यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन उषा खोत यांनी केले तर केशव साने यांनी आभार मानले.

Exit mobile version