| पनवेल | वार्ताहर |
गाढी नदीत बुडाल्याने निवृत्त नेव्ही कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि.29) घडली. जयवीर सिंग असे त्यांचे नाव आहे. या घटनेची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, जयवीर सिंग हे नेरे येथील ज्वेल रेसिडेन्सीमध्ये राहत असून, ते सोमवारी (दि. 28) पासून बेपत्ता होते. मंगळवारी त्यांचा मृतदेह नेरेपाडा ते केवाळे दरम्यानच्या गाढी नदीमध्ये ग्रामस्थांना दिसून आला. याची माहिती पनवेल तालुका पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर रुग्णवाहिका आणि पनवेल तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. पाण्यात बुडाल्याने जयवीर सिंग यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पनवेल तालुका पोलीस अधिक तपास करीत आहेत.
गाढी नदीत बुडून निवृत्त नेव्ही कर्मचाऱ्याचा मृत्यू
