रविवारी सेवानिवृत्त मुख्याध्यापकांचा मेळावा

आ. जयंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती

| अलिबाग | वार्ताहर |

रायगड जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा सेवानिवृत्त मुख्याध्यापक संघटनेचा दुसरा स्नेहमेळावा रविवार, दि. 3 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता वेश्वी-गोंधळपाडा (गोकुळेश्वर) ता. अलिबाग येथील पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी रा.जि.से.नि.मु.स.चे अध्यक्ष डॉ. श्रीकांत पाटील तसेच प्रमुख अतिथी म्हणून शेतकरी कामगार पक्षाचे आ. जयंत पाटील, पीएनपीच्या कार्यवाह तथा शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त मुख्याध्यापक संघटना महामंडळाचे अध्यक्ष सुभाषराव माने, संस्थापक अध्यक्ष अरुण थोरात, कार्यवाह आदिनाथ थोरात उपस्थित राहणार आहेत.

मेळाव्यात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते 75 वर्षे पूर्ण व त्यापुढील सेवानिवृत्त मुख्याध्यापक बंधू-भगिनींचा सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी उपकोषागार अधिकारी उद्धव जोशी यांचे पेन्शनविषयक मार्गदर्शन, डॉ. एस.एन. तिवारी यांचे आरोग्यविषयक तसेच आर.एस.पी. विभागीय समादेशक ॲड. के.डी. पाटील यांचे वाहतूक सुरक्षा व आपत्ती निवारण या विषयावर मार्गदर्शन होणार आहे. याच दिवशी महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त मुख्याध्यापक संघटना महामंडळाच्या राज्य कार्यकारिणीची सभा त्याच ठिकाणी आयोजित केली आहे, अशी महिती श्रीकांत पाटील यांनी दिली. तरी, या मेळावा व राज्य कार्यकारिणी सभेला संबंधितांनी उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Exit mobile version