सेवानिवृत्त सैनिकाचे जंगी स्वागत

| महाड । वार्ताहर ।

भारतीय सैन्य दलामध्ये 26 वर्षे देशाची सेवा करून सेवानिवृत्त होऊन परतलेल्या महाड तालुक्यातील जिते गावातील नायब सुभेदार मारुती कळंबे यांचे ग्रामस्थांनी मिरवणूक काढून जंगी स्वागत केले. सेवानिवृत्त सैनिकाला दिलेल्या या सन्मानामुळे सैनिक व त्याचे कुटुंबीय भारावून गेले.

नायक सुभेदार सचिन 30 डिसेंबर ला सेवानिवृत्त झाले. जिते येथील मारुती कळंबे यांना सात मुली आणि सचिन हा एकुलता एक मुलगा. एकुलता एक मुलगा असूनही त्यांनी मुलाला सैन्य दलात पाठवले. सचिन अनेक वर्ष काश्मीर येथे कर्तव्य बजावत होते. सेवानिवृत्त होऊन गावी परतणार्‍या नायब सुभेदाराचे ग्रामस्थांनी रविवारी (दि.1) जंगी स्वागत केले.

महाड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये दाखल होतात सचिन कळंबे यांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक केला व विधिवत पूजा केली. यानंतर त्यांनी चवदार तळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. ग्रामस्थांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून चवदार तळ्यापर्यंत खुल्या जीपमधून सचिनची खालुबाजाच्या तालावर जोरदार मिरवणूक काढली.

Exit mobile version