। खांब-रोहा । वार्ताहर ।
वहूर महाड येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संजय चंद्रकांत आंबेतकर यांचे अल्पशा आजाराने शनिवार, दि.18 सप्टेंबर रोजी निधन झाले. निधनसमयी ते 62 वर्षांचे होते. संजय आंबेतकर हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. मुंबई येथे आपला सेवाकाळ पूर्ण करून नुकतेच 2018 साली सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या पश्चात त्यांची आई, एक मुलगा, एक मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांचे अंतिम धार्मिकविधी रविवार, दि.26 सप्टेंबर रोजी वहूर निवासस्थानी होणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे.