नगरपंचायतीतर्फे निवृत्त शिक्षकांचा सन्मान

77 दिव्यांगांच्या खात्यावर प्रत्येकी दोन हजार जमा

| तळा | वार्ताहर |

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 132 व्या जयंतीचे औचित्य साधून तळा नगरपंचायत प्रांगणात निवृत्त शिक्षकांचा सन्मान सोहळा व दिव्यांगांना आर्थिक मदतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त तळा नगरपंचायतीतर्फे विविध उपक्रम राबविले जातात. गेल्या वर्षी नगरपंचायतीतर्फे निवृत्त पोलीस व लष्करातील निवृत्त जवानांचा सन्मान करण्यात आला होता. तसेच यावर्षी निवृत्त शिक्षकांचा सन्मान व दिव्यांग बांधवांना धनादेशाच्या वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी शहरातील 27 निवृत्त शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. तर, शहरातील 77 दिव्यांग बांधवांच्या खात्यावर प्रत्येकी दोन हजारप्रमाणे रक्कम जमा करण्यात आली. याप्रसंगी मुख्याधिकारी माधुरी मडके, नगराध्यक्षा अस्मिता भोरावकर, उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे, सर्वपक्षीय नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होत्या.

Exit mobile version