‘गार्ड ऑफ ऑनर’ची निवृत्ती

। अहमदाबाद । वृत्तसंस्था ।

आयपीएल 2024 मध्ये एलिमिनेटर सामन्यात राजस्थानने बंगळुरुला पराभूत केले. बंगळुरुच्या या पराभवासोबतच भारतीय संघाचा दिग्गज खेळाडू दिनेश कार्तिकचा आयपीएलमधील प्रवास अखेर संपला आाहे. दिनेश कार्तिकला बंगळुरुच्या खेळाडूंकडून ‘गार्ड ऑफ ऑनर’ देण्यात आला. यावेळी मैदानावरील वातावरण भावूक बनले होते.

राजस्थान रॉयल्सने मॅच जिंकल्यानंतर विराट कोहलीने सर्व खेळाडूंसोबत हस्तोंदलन केले. विराट कोहलीने इतर खेळाडूंसोबत हस्तोंदलन केले. दिनेश कार्तिक समोर येताच विराट कोहलीने त्याला मिठी मारली. अहमदाबादच्या प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून दिनेश कार्तिकचा सन्मान केला. दिनेश कार्तिकने हातातून ग्लोव्हज काढत आयपीएलमधून निवृत्तीचे संकेत दिले. राजस्थान विरुद्धची मॅच संपल्यानंतर आरसीबीच्या खेळाडूंनी दिनेश कार्तिकला ‘गार्ड ऑफ ऑनर दिला’. दिनेश कार्तिक मैदानावरुन ड्रेसिंग रुमच्या दिशेने चालत गेला. त्यानंतर आरसीबीचे खेळाडू त्याच्या मागे चालत गेले. दिनेश कार्तिकने आरसीबीसाठी दिलेल्या योगदानाचा याद्वारे सन्मान करण्यात आला. तो आरसीबीचा महत्त्वाचा फलंदाज होता. डेथ ओव्हरमध्ये दिनेश कार्तिकची कामगिरी महत्त्वाची असायची. प्लेऑफमध्ये दिनेश कार्तिकची भूमिका महत्त्वाची होती. तसेच, दिनेश कार्तिककडून अद्याप निवृत्तीची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. जगभरातील क्रिकेट चाहते या अधिकृत घोषणेची वाट पाहत आहेत.

आयपीएलमध्ये 17 वर्षाचे योगदान
दिनेश कार्तिकने आयपीएलमध्ये 17 वर्ष योगदान दिले आहे. दिनेश कार्तिक या काळात सहा फ्रँचायजीकडून खेळला. यात दिल्ली डेअरडेविल्स, किंग्ज इलेव्हन पंजाब, मुंबई इंडियन्स, गुजरात लायन्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या संघांचा समावेश आहे. दिनेश कार्तिकने दमदार कामगिरीच्या जोरावर 15 बॉलमध्ये 326 धावा केल्या. 36.22 च्या सरासरीने आणि 187.36 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत. तसेच, कार्तिकने 257 मॅचेसमध्ये 4842 धावा केल्या असून त्यामध्ये 22 अर्धशतकांचा समावेश आहे.
Exit mobile version