| सुतारवाडी | वार्ताहर |
यावर्षी जून महिन्यापासूनच ऑगस्टअखेर त्याचप्रमाणे सप्टेंबरमध्ये थोड्या प्रमाणावर पाऊस पडत असल्यामुळे भातशेती प्रत्येक ठिकाणी उत्तम प्रकारे आली आहे. वरसगाव, चिंचवली, सुतारवाडी तसेच पंचक्रोशीमध्ये भातशेती उत्तम आल्यामुळे बळीराजा खुशीत आहे.
कुडली, अंबिवाली, धगडवाडी या परिसरात तीळ, नाचणी, वरीची पिके थोड्या प्रमाणावर घेतली जातात. यावर्षीचा पाऊस या पिकांना पूरक असाच पडल्यामुळे पिके जोमात आली आहेत. आता भाताच्या पिकांना लोंब्या धरल्या असून, भातपीक नोव्हेंबरच्या दुसर्या किंवा तिसर्या आठवड्यात कापणीस तयार होईल, असा अंदाज येरळ येथील शेतकरी बाळ कृष्ण आयरे यांनी व्यक्त केले. दिवाळी सणापूर्वी आपल्या घरात पिवळं सोनं येणार या आनंदात बळीराजा आहे.