विद्यार्थ्यांना दिले भातलावणीचे धडे

हिरवळ एज्युकेशन ट्रस्ट नेचर क्लबचा स्तुत्य उपक्रम
| माणगाव | वार्ताहर |
हिरवळ एज्युकेशन ट्रस्ट ज्युनिअर कॉलेज व कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी महाडच्या नेचर क्लब विभागातर्फे सोमवार, दि. 11 जून रोजी विद्यार्थ्यांकरिता भातलावणी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या उपक्रमांतर्गत महाविद्यालय नजीकच्या भातशेतीत नेचर क्लबच्या प्रमुख प्रा. प्रिया कदम यांनी विद्यार्थ्यांना भातलावणीचे प्रात्यक्षिक दाखवले. त्यानंतर विद्यार्थ्यांमार्फत भातलावणी करण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये शेती व पर्यावरणाबद्दल आवड निर्माण करून जनजागृती करण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

हिरवळ एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष किशोर धारिया, संचालिका सोनाली धारिया व महाविद्यालयाच्या प्रमुख सल्लागार डॉ. संध्या कुलकर्णी हे पर्यावरणपूरक उपक्रमांना नेहमीच प्रोत्साहन देतात. सिनिअर कॉलेजचे प्राचार्य सुदेश कदम व ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या विद्या गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात सिनिअर व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

Exit mobile version