रिमशा इलेव्हन नांदगाव विजयी

राष्ट्रवादी काँग्रेस चषकाचे आयोजन
। रेवदंडा । वार्ताहर ।
साळाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने डायमंड क्रिकेट क्लब साळाव यांचे सहकार्याने राष्ट्रवादी काँग्रेस चषक भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन राष्ट्रवादी सरचिटणीस सय्यद खान यांनी केले होते. या स्पर्धेत रिमशा नांदगाव संघ विजयी ठरला. तर माऊ इलेव्हन नवगाव द्वितीय, ए-वन नांदगाव तृतीय व डायमंड क्रिकेट क्लब साळाव चतुर्थ क्रमांकाचे मानकरी ठरले.

या स्पर्धेत अंतिम सामन्यात मॅन ऑफ द मॅच नांदगाव संघाचा रिहान, उत्कृष्ट फलदांज साळाव डायमंड संघाचा अफताब, उत्कृष्ट गोलदांज नवगाव संघाचा जयेश तसेच मालिकावीर नांदगाव संघाचा निखिल धार्वे यांची निवड करण्यात आली. या स्पर्धेचा शुभारंभ राष्ट्रवारी काँग्रेस आ.अनिकेत तटकरे यांचे हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. तर बक्षिस वितरण कार्यक्रमास रा.कॉ.सरचिटणीस सय्यद खान यांचे प्रमुख उपस्थितीसह उपसरपंच साळाव दिनेश बापळेकर उपसरपंच साळाव, रवि सानेकर माजी सरपंच साळाव, काँग्रेस कार्यकर्ते सुहेल कासकर तसेच शबीर खान, सिराज दाखवे, मंगेश शेट्टी, रूस्तम चौगले, अनिल चोरढेकर आदी उपस्थित होते.

या स्पर्धेत रिमशा इलेव्हन नांदगाव संघास राष्ट्रवादी चषक 2022 व 50 हजार रूपये रोख रक्कमेचे देण्यात आले, या स्पर्धेत एकूण 32 संघ खेळविण्यात आले. यामध्ये 24 संघ गाव टू गाव खेळविले गेले. पंचाचे काम कल्पेश म्हात्रे व सहकारी यांनी पाहिले.

Exit mobile version