अलिबागच्या शिरपेचात मानाचा तुरा
। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबागच्या रितिका प्रशांत जन्नावार हिचा राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विधी शाखेत पदवीत्तर पदवी उतीर्ण करणार्या रितिकाला नानी पालखीवाला ट्रस्टच्यावतीने दिल्या जाणार्या सुवर्ण पदकाने तिला गौरविण्यात आले.
सिंबॉयसिस इंटरनॅशनल विद्यापिठाचा 21 वा दिक्षांत समारोह नुकताच पुणे येथे पार पडला. यावेळी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू, राज्यपाल सि.पी. राधाकृष्णन, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. यावेळी विद्यापिठातून उल्लेखनीय कामगिरी करत उत्तीर्ण होणार्या विद्यार्थ्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली. यात अलिबागच्या रितिकाचा समावेश होता. रितिका ही अलिबागमधील नावाजलेले डॉ. प्रशांत जन्नावार यांची कन्या आहे. तिने फॅमेली लॉ या विषयात एल.एल.एम. पदवी प्राप्त केली आहे. सर्वाधिक गुण मिळवत ती विद्यापिठात पहिली आली आहे. तिच्या या कागगिरीचे अलिबाग मधून कौतुक होत आहे.