मोहोपाडा रस्त्याला भगदाड

| रसायनी | प्रतिनिधी |

मोहोपाडा येथील जनता विद्यालय व एचडीएफसी बँकेकडे जाणाऱ्या रस्त्याला मधोमध भले मोठे भगदाड पडले आहे. त्यामुळे प्रवाशांसह नागरिकांना आपला जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे. या परिसरात जनता विद्यालय व ज्युनिअर कॉलेज तसेच बॅक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँकांचे कार्यालय, गॅस एजन्सी, छोट्या-मोठ्या कंपन्या, अनेक गॅरेज व इतर संकुलन असल्याने या रस्त्यावर नेहमी वर्दळ चालू असते. शिवाय रस्त्यालगत विद्यार्थी व बेकायदेशीरपणे लोडिंग वाहने पार्क केली जातात. या रस्त्यावरुन अवजड वाहनांमुळे एमआयडीसी रस्त्याची दुर्दशा झाली आहे. या रस्त्याच्या मधोमध भगदाड पडले असून एका बाजूला वाहन पार्क केल्यामुळे पादचाऱ्यांना चालण्यासाठी रस्ता अपुरा पडून त्या भगदाडात पाय अडकून जायबंदी व जीवितहानी होऊ शकते. यासाठी एमआयडीसी प्रशासनाने दखल घ्यावी, अशी सर्व स्तरातून मागणी नागरिकांतून होत आहे.

Exit mobile version