मुरूड-नागशेतचा साईटचा रस्ता खचला

। आगरदांडा । प्रतिनिधी ।

मुरूड तालुक्यातील शिघ्रे ग्रामपंचायत हद्दीतील नागशेत हा रस्ता पर्यटकांना येणाऱ्या जाणाऱ्या मुख्य रस्ता आहे. या मुख्य रस्त्यावरून पर्यटक मुरूडकडे ये -जा करित असतात. परंतु, मुसळधार पावसामुळे साईटचा रस्ता अचानक खचल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

या घटनेमुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही मोठा धोका निर्माण होऊ शकतो. या घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते अरविंद गायकर व उद्धवसेना पक्षांचे युवा नेते- कुणाल सतविडकर यांनी घटनास्थळी धाव घेत रस्त्याची पाहणी केली आणि हा रस्ता तातडीने डागडुजी करावी, अशी मागणी केली आहे. तरी या ठिकाणी रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनचालकांनी गाडी सावकाश चालवावी, असे आवाहनदेखील सामाजिक कार्यकर्ते अरविंद गायकर व कुणाल सतविडकर यांनी केले. यावेळी अरविंद गायकर यांनी सांगितले की, सार्वजनिक बांधकाम विभागाने या खचलेला रस्तातकडे लक्ष देऊन तातडीने या खड्ड्यात खड्डी सिमेंट व रेती टाकून हा रस्ता सुरळीत करावी. तसेच अपघात टाळण्यासाठी खचलेल्या भागाभोवती सुरक्षेची उपाययोजना कराव्यात जेणेकरून या ठिकाणी अपघात होणार नाही. तरी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर रस्त्याची दुरुस्ती करावी. वेळेत दुरुस्ती न झाल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Exit mobile version