बाळाराम पाटील यांच्या हस्ते‌ ‘रोडमॅप‌’ पुस्तकाचे प्रकाशन

| पनवेल | प्रतिनिधी |

दहावी आणि बारावीच्या परीक्षांनंतर पुढील शिक्षणासाठी योग्य अभ्यासक्रमाची निवड करता यावी, या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या ‌‘रोडमॅप‌’ या मार्गदर्शक पुस्तकाचे माजी आ. बाळाराम पाटील यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

विचुंबे येथे शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत साई संदेश वेल्फेअर असोसिएशनच्या नवरात्रोत्सवात हा सोहळा उत्साहात पार पडला. या उपक्रमासाठी आशाप्रभा न्यू इंग्लिश स्कूलचे चेअरमन पुरुषोत्तम भोईर यांनी पुढाकार घेतला. प्रकाशन सोहळ्यात माजी आ. बाळाराम पाटील यांनी पुरुषोत्तम भोईर यांच्या उपक्रमाचे कौतुक केले.

या पुस्तकातील मजकुराचे संकलन ज्येष्ठ पत्रकार मंदार दोंदे यांनी केले असून, नवी मुंबईतील प्रिंट ऑन सोल्युशन्सचे संचालक प्रशांत चातुर्य यांनी पुस्तकाची छपाई केली आहे. आशाप्रभा न्यू इंग्लिश स्कूल, विचुंबे येथे दहावी, अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना ओळखपत्र दाखवून पुस्तकाची प्रत विनामूल्य मिळणार आहे. या सोहळ्यास पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवेंद्र मढवी, उपसभापती सुनील सोनावळे, संचालक देवेंद्र पाटील (देवा), प्रणाली भोईर, सतीश म्हात्रे, समीर दुंदरे, अतुल भोईर, धनश्री भोईर, संचिता पाटील, करुणा म्हात्रे यांच्यासह विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

केवळ रस्ते आणि पायाभूत सुविधांची उभारणी म्हणजे गावाचा सर्वांगीण विकास नव्हे. विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता, अध्ययनक्षमता आणि शैक्षणिक प्रगती वाढविण्यासाठी केलेले प्रयत्नही तितकेच महत्त्वाचे आहेत. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या आवडीनुसार शिक्षण घेऊन करिअर घडवावे, या प्रामाणिक भावनेतून सहकाऱ्यांच्या मदतीने पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे.

पुरुषोत्तम भोईर
चेअरमन आशाप्रभा न्यू इंग्लिश स्कूल
Exit mobile version