। पनवेल । प्रतिनिधी ।
दहशतवादी विरोधी पथकाचे अधिकारी असल्याची थाप मारून डिजिटल अटकेची भीती दाखवत एका व्यापाऱ्यााला तब्बल 1 कोटी 54 लाख 98 हजारांना लुटले. या प्रकरणी चार व्यक्तींविरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार हे स्टील मार्केटमधील व्यावसायिक असून, सध्या निवृत्तीचे जीवन जगत आहेत. त्यांच्या मोबाईलवर आलेल्या फोनवरून समोरील व्यक्तीने स्वतःची ओळख दहशतवाद विरोधी पथकातील अधिकारी म्हणून करून दिली. दहशतवादी संघटनेशी तुमचे आर्थिक व्यवहार आले असून तुमच्या खात्यातून संघटनेच्या खात्यात पैसे हस्तांतरित केले जात होते. त्यामुळे तुम्हाला डिजिटल अटक करावी लागणार, अशी भीती दाखवत ऑनलाइन पद्धतीने पैसे लुटण्यात आले.







