रोहा वनविभागतर्फे अवैध वृक्षतोडपासून तयार कोळसा जप्त; एकावर गुन्हा दाखल

३ लाख ४ हाजार ४२० रुपयांचा मुद्देमाल जप्त
। रोहा । प्रतिनिधी ।
अवैध वृक्षतोड करून तयार केलेला १३ पोती कोळसा रोहा वनविभागाने बोलेरो पिकअप गाडीसह जप्त केला असून याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपवनसंरक्षक रोहा आप्पासाहेब निकत व सहाय्यक वनसंरक्षक रोहा विश्वजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल रोहा मनोज वाघमारे व स्टाफ पवार वनपाल मेढा, निलेश वाघमारे वनपाल गोफण, तेजस नरे वनरक्षक शेणवई, ज्योती मिरगणे वनरक्षक निडी, योगेश देशमुख वनरक्षक मेढा, जयवंत वाघमारे वनरक्षक यशवंतखार, वनरक्षक फिरते पथक रोहा अजिंक्य कदम, पोपट करांडे, वनरक्षक रोहा विकास राजपूत, वनरक्षक ताम्हणशेत वैभव बत्तीसे, लेखापाल प्रदीप इनामदार या पथकाने दिनांक २५ जून रोजी रात्री ९ वाजता मिळालेल्या गुप्त बातमी वरून रोहा तालुक्यातील अष्टमी एच पी पेट्रोल पंपासमोर बोलेरो पीकअप क्रमांक एमएच ०६ एजी ५९७५ ची तपासणी केली असता अवैध वृक्षतोड करून तयार केलेले कोळसा पोती १३ वजन २६० किलो, किंमत ४४२० रुपये व जप्त वाहन अंदाजे किंमत ३ लाख रुपये विनापरवाना वाहतूक करीत असताना आढळून आला.

सदर वाहनावर भारतीय वन अधिनियम १९२७ अंतर्गत वन गुन्हा दाखल करून वाहन व कोळसा पोती असा एकूण ३,०४,४२० रुपये इतका मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर गुन्हे प्रकरणी वाहन चालक अन्सार शेख रा. नागोठणे, ता. रोहा याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version