रोहा नगरपरिषदः पाच जागा ना.मा.प्र.साठी राखीव

। रोहा । प्रतिनिधी ।
रोहा न.प. आरक्षण माणगाव प्रांताधिकारी प्रशाली दिघावकर व मुख्याधिकारी यांच्या उपस्थितीत काढण्यात आले. 10 प्रभागांत 20 जागा असून, त्यापैकी 5 जागा नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. रोहा नप मध्ये अनुसूचित जाती व जमातीसाठी एकही जागा आरक्षित नसल्याचे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, प्रभाग क्रमांक 3 व 9 मध्ये नागरिकांचा मागासप्रवर्गासाठी प्रत्येकी एक जागा राखीव झाली असून, प्रभाग 5, 6 व 10 मधील प्रत्येकी एक जागा याप्रमाणे तीन जागा नागरिकांचा मागासप्रवर्गातील महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. उर्वरित प्रभागांत 7 जागा सर्वसाधारण महिलांसाठी, तर 8 जागा सर्वसाधारण गटासाठी जाहीर झाल्या आहेत. याप्रसंगी सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version