| उरण | प्रतिनिधी |
उरण नगरपरिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागनिहाय अंतिम आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. या आरक्षणानुसार, नगरपरिषदेच्या एकूण 21 जागांपैकी 11 जागा महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे निवडणुकीत महिलांचा सहभाग लक्षणीय असेल.
नगरपरिषदेच्या एकूण 21 जागांवर विविध प्रवर्गासाठी आरक्षण लागू करण्यात आले आहे. नागरिकांचा मागास प्रवर्ग या प्रवर्गासाठी एकूण 6 जागा आरक्षित आहेत. यापैकी 3 जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी एकूण 2 जागा आरक्षित आहेत. यापैकी 1 जागा अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव आहे. अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी कोणतीही जागा आरक्षित नाही (निरंक). सर्वसाधारण प्रवर्गासाठी एकूण 13 जागा आरक्षित आहेत. यापैकी 8 जागा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.







