| रोहा | वार्ताहर |
रोहा तालुक्यात पुन्हा एकदा एक धक्कादायक घटना घडली आहे. आजीने एक वर्षाच्या नातवाला सोबत घेऊन बुधवारी (दि.09) सकाळी साडेसहाच्या सुमारास इमारतीवरून उडी मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत आजीचा जागीच मृत्यू झाला असून नातवाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दोघेही ओम चेंबर येथील रहिवासी असून उर्मीला सिद्धाराम कोरे (51) असे उडी मारणाऱ्या महिलेचे नाव आहे. तर, वेदांत विवेक भोगडे (1) असे नातवाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उर्मिला कोरे या रोहा कोलाड रस्त्यावर ओम चेंबर बिल्डिंगमध्ये राहत होत्या. त्यांनी सकाळी साडेसहाच्या सुमारास इमारतीच्या टेरेसवरून नातू वेदांत बोगडे याच्यासह उडी मारली. त्यात उर्मिला यांचा जागीच मृत्यू झाला. तर, नातू वेदांत भोगडे याला गंभीर दुखापत झाल्याने पुढील उपचाराकरिता रोहा शासकीय हलवण्यात आले होते. परंतु, मुलाची नाजूक परिस्थिती असल्यामुळे त्याला नवी मुंबई येथील एमजीएम या रुग्णालयात पुढील उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण रोहा परिसर हादरला असून, सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, आत्महत्यांचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.