रोहा संघ अंतिम विजेता

। खांब-रोहे । वार्ताहर ।
अलिबाग येथे संपन्न झालेल्या जिल्हा कुमार गट निवड व अजिंक्यपद चाचणी स्पर्धेत रोहे शहरातील जय बजरंग रोहा संघाने अंतिम सामन्यात सर्वोत्तम खेळ करीत विजेतेपद पटकावले आहे. जय बजरंग रोहा संघाने जिल्ह्यातील मातब्बर संघांवर मात करून हे विजेतेपद पटकावले आहे. या स्पर्धेत एकूण 128 संघांनी सहभाग नोंदविला होता. तर जय बजरंग संघाचा कर्णधार व अष्टपैलू खेळाडू लिराज पाटील याने सर्वोत्तम खेळ केल्याने जिल्ह्याच्या कुमार गट संघात त्याची निवड झाली आहे. निवड झालेला रायगडचा संघ पुणे येथे 5 मे ते 8 मे या कालावधीत होणार्‍या स्पर्धेत खेळणार आहे.
कुमार गटातून खेळणार्‍या सौरभ वाघावले, राजेश भस्मा, राज मोरे, अभिषेक शिंदे, ओम ठाकुर, श्रीयोग महाबळे यांनी देखील चांगला खेळ करून संघासाठी चागले योगदान दिले. जत्र बजरंग रोहा संघाने यापूर्वी देखील 2018 मध्येही जिल्हा कुमार गट स्पर्धेत विजेतेपद पटाकावले होते.तर 1019 मध्र्ये रोहा किशोरगट संघाने जिल्हा अंजिक्ययपद पटकावले होते. तसेच 2021 मध्ये तृतीय क्रमांक संपादित केला होता.

Exit mobile version