रोहित शर्मा अलिबागच्या प्रेमात

| अलिबाग | प्रतिनिधी |

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने सोमवारी (दि.11) अलिबागच्या उपनिबंधक कार्यालयात भेट दिली. एका जमीन व्यवहाराशी निगडीत कामासाठी रोहित शर्मा आला होता. म्हात्रोळी आणि सारळ येथील एका जागेच्या व्यवहारात रोहित शर्माने सुमारे 49 लाखांची स्टॅम्पड्युटी भरली. रोहित शर्मा याने यापूर्वीही अलिबाग तालुक्यातील विर्तसारळ येथे जमीन खरेदी केली आहे. भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौर्यासाठी रवाना झाला आहे. भारताला 22 नोव्हेंबरपासून 5 कसोटी सामन्यांची बॉर्डर गावसकर ट्रॉफी खेळायची आहे. या मालिकेसाठी भारतीय संघात निवड झालेले खेळाडू दोन तुकड्यांमध्ये रविवारी (दि.10) व सोमवारी (दि.12) ऑस्ट्रेलियाला रवाना होत आहे. पण एकिकडे भारतीय खेळाडू ऑस्ट्रेलियाला गेले असतानाच भारताचा कर्णधार रोहित शर्मा मात्र अद्याप भारतात आहे. तो वैयक्तिक कारणामुळे भारतीय संघासोबत जाणार नसल्याचे समोर आले होते. मिळालेल्या माहितीनुसार रोहित शर्मा अलिबागमधील उपनिबंधक कार्यालयात उपस्थित होता. याठिकाणी तो त्याच्या जागेशी निगडीत कामासाठी आल्याचे समजते. म्हात्रोळी आणि सारळ येथील एका जागेच्या व्यवहारात रोहित शर्माने सुमारे 49 लाखांची स्टॅम्पड्युटी भरल्याचे समजते.

Exit mobile version