| चणेरा | प्रतिनिधी |
रोहा येथील पत्रकार संतोष सातपुते व शिक्षिका श्वेता संतोष सातपुते यांची सुकन्या सिद्धी सातपुते बीएएमएस डॉक्टर ही परीक्षा मुंबई विद्यापीठाच्या बी.आर. हर्णे आयुर्वेदिक महाविद्यालय वांगणी बदलापूर येथून उच्च गुण मिळवून उत्तीर्ण झाली आहे. तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
डॉ. सिद्धी सातपुते ही लहानपणापासून गुणवंत आणि हुशार असून, आईवडील उच्च शिक्षित असल्याने आपली मुलगी डॉक्टर व्हावी, हे त्यांचे स्वप्न तिने पूर्ण केले. तिचे संपूर्ण प्राथमिक व उच्च माध्यमिक शिक्षण हे जे.एम. राठी स्कूल रोहा, येथे पूर्ण करत तिने मोठ्या जिद्दीने व मेहनतीने बीएएमएस पूर्ण करून केले आहे. तिच्या या यशाबद्दल सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी तिचे अभिनंदन केले असून, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.