भूटान येथे स्पर्धेसाठी होणार रवाना
| खरोशी | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील पेण येथील युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशनमध्ये रवींद्र म्हात्रे यांच्याकडे प्रशिक्षण घेत असलेले विद्यार्थी गौरव गोरखनाथ म्हात्रे, मोहित परशुराम कोठेकर, रितुल रवींद्र म्हात्रे, रविना रवींद्र म्हात्रे यांची निवड करण्यात आली आहे. ही टीम मर्दानी स्पोर्ट एशियनचे अध्यक्ष मंदार पनवेलकर तसेच मर्दानी स्पोर्टचे इंडिया सचिव संतोष खंदारे यांच्या नेतृत्वाखाली भुतान येथे खेळणार आहे. या सर्व निवड झालेल्या खेळाडूंचे युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशनतर्फे व मर्दानी स्पोर्टतर्फे अभिनंदन करण्यात येऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.