रोटरॅक्ट क्लब ऑफ अलिबाग सिशोअरने घेतला नाविन्यपूर्ण उपक्रम

मराठी भाषा नेली सातासमुद्रापार…
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
10 जानेवारी रोजी रोटरॅक्ट क्लब ऑफ अलिबाग सिशोअर तर्फे ” हॅप्पी न्यू इयर ” हा उपक्रम घेतला गेला त्यात मैक्सीको, युगांडा, नेपाळ, पकिस्तान देशांच्या रोटरॅक्ट क्लबने सुद्धा सहभाग घेतला, या उपक्रमात रोटरॅक्ट क्लब ऑफ अलिबाग सिशोअरने आपल्या मातृभाषेत नविन वर्षाच्या शुभेच्छा देतानाचे व्हीडिओ करण्यासाठीची विनंती केली व ते व्हीडिओचे एकत्रीकरण करुन व्हीडिओ ‘ रोटरॅक्ट क्लब ऑफ अलीबाग सिशोअर ‘ या यूट्यूब चॅनलवर रीलीज करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे मराठी भाषा ही सर्व देशात पोहोचेल. या उपक्रमात रोट्रॅक्टर तेजस पानकर, नेहारिका घोसाळकर, ओंकार घोसाळकर, गौरी चव्हाण, तन्वी शेटये, प्रीती वंजारी, कृतिका शेळके, विद्या साळुंके यांचा सहभाग होता.

Exit mobile version